Last Updated: Tuesday, January 10, 2012, 17:44
www.24taas.com, मुंबई
शिवसेना आरपीआय महायुतीच्या कोट्यातल्या जागावाटपाची पहिली यादी बाहेर पडलीय. झी २४ तासच्या हाती शिवसेना-भाजपनं आरपीआयला सोडलेल्या २६ वॉर्डची लिस्ट लागलीय. गेल्या काही दिवसांपासून आठवलेंच्या तीस जागांची मागणी आणि त्यात दलित पॅथरचा दावा यामुळे आरपीआयला कोणते वॉर्ड मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागल होतं.
महायुतीमध्ये RPI च्या वाट्याला आलेल्या २६ जागांपैकी एकही जागा गेल्यावेळी भाजप शिवसेनेनं जिंकलेली नाही. आरपीआयनं गेल्यावेळी जिंकलेल्या तीनही जागा आरपीआयला सोडण्यात आल्या आहेत. युती दुस-या क्रमांकावर असलेल्या ७, तर तिस-या क्रमांकाच्या १० जागा सोडण्यात आल्या आहेत. इतर ठिकाणी युती चौथ्या, पाचव्या स्थानावर होती. तसंच अरुण गवळींच्या अखिल भारतीय सेनेनं जिंकलेल्या दोन्ही जागाही, आरपीआयला देण्यात आलेल्या आहेत.
शिवसेनेने RPIसाठी सोडलेले वॉर्ड-
25,35,70,85,91,126,128,133,135,137,140,155,159,175,178,180,202, 204,220,222
भाजपने RPIसाठी सोडलेले वॉर्ड -
43,61,138,145,148,205
First Published: Tuesday, January 10, 2012, 17:44