Last Updated: Wednesday, February 29, 2012, 23:14
www.24taas.com
आर आर पाटील. महाराष्ट्राचे गृहमंत्री आबांना तंबाखुच व्यसन आहे हे त्यांच्यावर झालेल्या फेमस पिचकारी टिकेनं महाराष्ट्राला ज्ञात झालं, मात्र राज्याला डान्सबार मुक्त आणि तंटामुक्त करण्याची स्वप्न पाहणा-या आबांच्या जिल्ह्यात चक्क अफिमची शेती सापडल्याने तंबाखूच्या 'पिचकारी' पेक्षा ही अफूची 'गोळी' आबांना भारी पडणार असच दिसतय. गुन्हेगारांना कोपरापासून-ढोपरापर्यंत फोडून काढण्याची भाषा करणा-या गृहमंत्री आर आर पाटील आता घरच्याच मैदानावर कोंडीत साप़डलेय़त.. पुण्या मुंबईला डान्सबार मुक्तीची सक्ती आणि महाराष्ट्रात ग्रामस्वच्छताचा नारा देणारे आर आर आबावर सांगलीतच अफूची शेती सापडल्यानं राजकीय चिखलफेक सुरु झालीय. आतंरपीक म्हणून घेतल्या जाणा-या या खसखसीच्या झाडामुळे राजकारण्याना मात्र नव्या वादासाठी फोडणीचा मसाला मिळालाय.
खुद्द वनमंत्री पतंगराव कदम यानीच आंबाच्या गृहखात्याला टार्गेट केल्यानंतर हा वाद राजकिय असेल अस वाटत असताना आता शेतकरी नेत्यानीही तोच आरोप केल्यानं या वादाला जास्त खतपाणी मिळालयं.. शेतक-यांनी पोलिसांना हप्ते दिले नाहीत म्हणूनच त्यांनी अफू शेतीविरोधात कारवाई सुरु केल्याचा खळबळजनक आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केलाय.... बीड पाठोपाठोपाठ गृहमंत्र्याच्या सांगली जिल्ह्यात आणि गृहराज्यमंत्र्याच्या कोल्हापूर जिल्ह्यात अफूच्या शेतीचा प्रकार उघड झालाय. अफूची बोंड वाळल्यावर त्यातून खसखस तर वाळलेल्या टरफलांपासून नशा आणणारे पदार्थ केले जातात. त्याची बोंड तीन ते साडे तीन हजार रुपये किलोनं विकली जातात.
पोलिस जरी कारवाईची भाषा करत असली तरी या कारवाईला मुळात उशीरच का झाला असाही मतप्रवाह निर्माण झालाय.. आणि त्यावरुन गृहमंत्री आणि पोलिस खात्याला टिकेला सामोरं जावं लागतय..
सांगलीतच अफूची रोपं मिळाल्यानं विरोधकाना आबांना टार्गेट करण्यासाठी एक दमदार मुद्दा मिळालाय. पण यानिमित्तानं कुणाचीही गय करणार नाही अस महाराष्ट्रात दौरे करुन भाषणबाजी करणा-या आर आर पाटील याना आता आपल्याच जिल्ह्याची झाडाझाडती घेण्याची वेळ आलीय हे मात्र नक्की..
नशेचा परमोच्च बिंदू गाठून देणारी शतकानुशतकांची जुनी नशा अफू... अय्याश राजे महाराजांच्या काळात या अफूच्या गोळ्या बनवण्यासाठी असायचे खास अफिमची असा हा अफू कुठून आला भारतात? कशी बनते झाडापासुन अफूची गोळी? कायद्याने बंदी असुनही का करतायेत शेतकरी लागवड अफूची ?
अफू.. कालपर्यंत केवळ सिमावर्ती भागात चर्चिला जाणारा हा शब्द आता सर्वसामान्याच्या शिवारातही तेवढ्याच ताकदीनं का बोलला जातोय हा प्रश्न महाराष्ट्राच्या गृहविभागालाच नव्हे तर कृषी खात्यालाही सुन्न करुन टाकतोय. बंदी असलेल्या या उत्पादनांच आता जिल्ह्याजिल्ह्यात पिकांचं प्रमाण साप़डत असल्यानं सारेच जण चक्रावून गेलेय़तं. काही वर्षांपर्यंत किरकोळ आणि छुप्या पद्धतीने घेतलं जाणारं हे पिक आता एकराच्या एकर बांगामध्ये दिसू लागलंय.. कांदा या पिकास आंतरपिक म्हणून खसखस हे पिक घेतलं जाण्याची महाराष्ट्रातील काही भागांमध्ये प्रथा आहे. सुरुवातीला कांद्याच्या तरुमध्ये आंतरपिक म्हणून घेतलं जाणा-या या खसखरीच्या रोपाना, अफूचा जोडधंदा मिळताच कांद्याच्या बागावंरच संक्रात आली आणि शेकडो एकरवर दिसू लागली ती फक्त अफूची शेती... अफूची शेती कायद्याच्या दृष्टीने प्रतिंबधीत असली तरी फासावर आपलं आयुष्य संपवणा-या शेतक-याना खसखसीचे हे पिक वरदान ठरताय.. आणि म्हणूनच याच शेतक-याच्या न्यायासाठी
शेतकरी नेत्यानी आता थेट शेतक-यासाठी अफू परिषदेची घोषणाच करुन टाकलीय अफू हि पॅपॅव्हेरेसी कुळातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव पॅपॅव्हर सोम्निफेरम असे आहे. या वनस्पतीपासून अफू हा एक मादक विषारी पदार्थ मिळतो. तो अफूच्या कच्च्या फळांना चिरा पाडून मिळवला जातो. चिरा पाडल्यावर फळातून रस पाझरतो आणि हा रस वाळवून घट्ट केला की अफू हा मादक पदार्थ मिळतो. या अफूची लागवड प्राचीन काळापासून होत आली आहे. अफूचे झुडूप मुळचे पश्चिम अशियातील असून अरबांकडून ते चिनमार्गे आता थेट बीड-सांगलीपर्यत जावून पोहोचलयं.
अफू हे 60 ते 120 सेंमी. उंची असणारे वर्षायू झुडूप आहे. याची पाने साधी, कमी जास्त करवती काठाची, तळाशी खोडास वेढून राहणारी असतात. बिया लहान, पांढ-या व विपूल असून त्यांनाच खसखस म्हणतात. खसखशीचा वापर करण्यासाठीच केवळ हे पिक घेतात असा जरी दावा नसला तरी शेतक-यांच्या आत्महत्येचं प्रमाण सतत वाढवणा-या याच महाराष्ट्रात, अफू लागवडीमुळे शेतक-याना चार पैसे मिळू लागलेयत हे वास्तव आहे..कृषीप्रधान महाराष्ट्रात आंतरपिकावर वक्रदृष्टी ठेवण्याची भूमिका नेहमीच शेतक-यांना नेहमीच संकटात टाकतेय.. विदेशातल्या या पिकानं महाराष्ट्राच्या देशी मातीतही आपली पाळेमुळे घट्ट रोवलीय. अफू हे पिक सुरुवातीस खसखससाठी, कांद्याचे तरु, मका आणि ऊस यामध्ये आंतरपिक म्हणून घेतले जात होते. डिसेंबर आणि जानेवारीत मुख्य पिकांबरोबरच अफूची लागवड करण्यात येते. साधारण दीड महिन्यानंतर याला गुलाबी - पांढ-या रंगाची फुले येतात. यातली टिचभर खसखस काढून घेतली कि, शेतक-याना मिळतोय अफाट फायदा.. आणि अफूचा हाच फायदा गैर कि योग्य हा अनुत्तरीत सवाल महाराष्ट्रात वादळ निर्माण करतोय.
कॅश क्रॉप म्हणून ओळखलं जाणा-या अफूला आता महाराष्ट्राचं शिवार मिळतय.. यापासून शेतक-याना फायदा होत असला तरी गृहखात्याच्या ते अडचणीचं ठरणार आहे. कारण याच अफूच्या पीकातून मिळणा-या हेरॉईनचा बक्कळ पैशातून चालणार अफूमाफियांनी आता अवघ्या जगालाचं विळखा घातलाय. खसखशीच्या पीकातून अफू.. अफूतून हेरॉईन आणि हेरॉईनमधुन प्रचंड पैसा या सूत्रातून अफूच्या उत्पादनातून प्रचंड पैसा ओढला जातोय. अफू... आज या शब्दानं महाराष्ट्राच्या गृहखात्याच्या कर्तव्यदक्षतेची धुंदीही खडकन उतरवलीय.. एवढ्या मोठ्या प्रमाणात अफूची पिक साप़डल्यानं आता अफूचा पीक नेमंक का घेतलं जातय. त्यापासून नेमका शेतक-याना काय फायदा मिळतोय या प्रश्नाची उत्तर शोधली जातायतं.. अफू हा पदार्थ वैद्यकीय दृष्ट्या उपयुक्त असलेल्या अल्कालॉइडांसाठी प्रसिध्द आहे. फळांपासून मिळणारी अफू चवीला कडू, स्तंभक, मादक, वेदनाहारक असून ती बध्दकोष्ठता नष्ट करते. तसंच अनेक विकारांवर ती उपयुक्त ठरते. तिच्या बिया पौष्टीक असतात. याच खशखशीपासून तेल काढतात. तर खाद्यपदार्थांमध्येही खसखस वापरतात. अफूचा मादकपणा खशखशीमध्ये नसतो.
खशखशीचे तेल खाण्यासाठी आणि विषेशकरून चित्रकारांचे रंग व साबण तयार करण्यासाठी वापरतात. नशेसाठी अफूचे सेवन प्राचीन काळापासून प्रचलित आहे. तिच्यामधील अल्कलॉईडचे सेवन करुन, धुरावाटे किंवा तिचा अर्क शरिरात टोचून वापरली जातात. नशेसाठी अफू सेवन केलेल्या व्यक्तीला पुन: पुन्हा सेवनाची इच्छा होउन ती व्यक्ती व्यसनात कायमची गुरफटली जाते. जगातील बहुसंख्य राष्ट्रांत अफुचे सेवन आणि निर्मिती बेकायदा ठरवली आहे. भारतामध्ये अफूच्या झाडाच्या लागवडीवर, उत्पादनावर, औषधी घटकांच्या निर्मितीवर कायद्याने नियंत्रण आहे. अफूचे शुध्दीकरण, प्रत, विक्री, निर्यात, अल्कलॉइडांची निर्मिती इत्यादी बाबी सर्वस्वी भारत सरकारच्या आधिपत्याखाली होतात. भारत हा जगातील एकमेव मान्यता प्राप्त अफू निर्माण करणारा देश आहे.. पण असं जरी असलं तरी अफूचे दुष्परीणाम हे अफूच्या औषधी गुणावरही वरचढ ठरतायत.. अफूच्या नशेन आज तरुण पिढी बरबाद होत चाललीय.. अफूला आज जगाच्या बाजारात किमत आहे ती त्याच्या औषधी गुणापेक्षाही त्यात असलेल्या प्रभावी अमंलबाज असलेल्या नशेमुळेच.. आणि म्हणूनच आज हे पिक जगाच्या बाजारात आणि महाराष्ट्राच्या शिवारात बंदी ओढवून घेतय.. अफूचं पीक घ्याव की, खसखशीच्या आंतरपीकावरचं मर्यादीत राहावं हा मुद्दा आता कळीचा ठरतोय.. सातबारावर नोंद उस कांदा अशी असेल तर मग अफूची शेती प्रत्यक्षात कशी कशी हा सवाल अंतर्मुख करुन जातोय.
शेतकरी नेत्याचा हा सवाल कृषीप्रधान महाराष्ट्रातल्या बळीराजाच्या सद्यस्थितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय.. नव्या तंत्रज्ञानाला प्रवृत्त होत आणि विक्रमी उत्पादनही घेतो मात्र हाच माल बाजारात आणला की मग शेतक-याला अत्यल्प दर देउन शेतक-याला उध्वस्त केलं जातं. शेतक-यांच्या मालाला भाव देण हे सहजा सहजी शक्य नसल्याची ही हतबलता कृषीमंत्र्यानीही बोलून दाखवलीय..शेतक-यांना आधार देणार कृषी मुल्य आयोगाकडेही ह्याच उत्तर नाही हे विशेष.. बीड- सांगली जिल्ह्यातील ज्या शेतक-यांकडे खसखस पिकली ते उसतोड मजूर आहेत...एकरी आंतरपीक म्हणून घेण्यात येणा-या हा पीकाचं उत्पादन 5 क्विंटल पर्यंत येतं...किलोला ५ रुपये भाव मिळत असल्याने शेतक-याला एकरी फक्त 25 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळतं.. मात्र हिच खसखस ग्राहकांपर्यंत पुढे १०० रुपये किलोने विकली जाते... गहू, मका अशा पिकांच्या तुलनेत खसखशीला खत, आंतरमशागत आणि औषधांचा अतिरिक्त खर्च येत नाही.. त्यामुळे खेळतं भांडवल मिळाव या हेतुने शेतकरी ही पीक घेतात..
खसखस पिकवणं कायद्यानं गुन्हा नसला तरी अफुसाठी तोच शेतकरी गुन्हेगार ठरतो. सर्वच पिकांचे हमीभाव पडत असताना शेतक-यांनी हा खसखशीचा मार्ग स्विकारला..अगोदर कापूस,मग कांदा, त्यानंतर उस,तसेच वीज, आणि आता अफू परिषद ही आंदोलनाची साखळी वाढत चाललीय. बळीराजाचा महाराष्ट्र असं म्हणताना आज शेतकरी अफू पिकवताना कायद्याचा गुन्हेगार असेलही, पण हा गुन्हा तो का करतोय त्याच्या समोर सामाजिक परिस्थीतीची कारण वेळीच शोधणं गरजेचं बनलय़..
First Published: Wednesday, February 29, 2012, 23:14