Last Updated: Tuesday, March 13, 2012, 23:40
गेल्या आठ वर्षापासून अस्तीत्वात असलेलं शिर्डीतील साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळ 15 दिवसांत बरखास्त करण्याचा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे..या निर्णयामुळे शिर्डीतील ग्रामस्थांनी दिवाळी साजरी केलीय..कोर्टाचा हा निर्णय एकप्रकारे राज्य सरकारसाठी चपराकचं असल्याचं बोललं जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने मंगळवारी एक महत्वपूर्ण निर्णय दिला आणि शिर्डीतील ग्रामस्तांनी दिवाळी साजरी केली... कोर्टाने शिर्डीतील साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळ 15 दिवसांत बरखास्त करुन नवीन विश्वस्त नेमण्याचा आदेश दिलाय. राजेंद्र गोंदकर यांनी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त निवडीला कोर्टात आव्हाण दिलं होतं....त्या याचिकेवर सुनावणी दरम्यान औरंगाबाद खंडपिठाने हा निकाल दिला असून त्यामुळे साईबाबा संस्थान पून्हा एकदा चर्चेत आलं आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला चांगलीच चपराक बसली आहे...कारण राज्य सरकारने तसा कायदा करुनही त्यावर अंमलबजावणी केली नव्हती. राज्य सरकराने विश्वस्त नेमणुकीतील त्रूटी दूर करण्यासाठी एक विशेष कायदा केलाय..त्या कायद्याला संस्थान विश्वस्त व्यवस्था असं नाव देण्यात आलं आहे..या कायद्यात विश्वस्त नेमणुकीचे नियम घालून दिले आहेत..संस्थान विश्वस्त व्यवस्था कायद्यानुसार 2004मध्ये राज्य सरकारने शिर्डीतील साईबाबा संस्थानवर 17 विश्वस्तांची नेमणुक केली होती..साईबाबा संस्थान सारख्या प्रसिद्ध आणि श्रीमंत संस्थानवर आपली वर्णी लागावी म्हणुन अनेकांनी जोर लावला होता. संस्थानवर विश्वस्तांची नेमणुक करण्यात आली त्यामध्ये राजकीय व्यक्तींचा मोठा भरणा होता. पुढच्या काळात काही विश्वस्त साईबाबा संस्थानच्या तिजोरीतील पैसा आपल्या मतदार संघात घेऊन जात असल्याची भावना ग्रामस्तांमध्ये निर्माण झाली होती...राज्य सरकारने तीन वर्षासाठी संस्थानवर विश्वस्तांची नियुक्ती केली होती.. पण मुदत संपल्यानंतरही राज्य सरकारने नवीन विश्वस्तांची नियुक्त केली नाही..या सर्व प्रकाराविरोधात राजेंद्र गोंदकर यांनी कोर्टात धाव घेतली..आणि कोर्टाने साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळ बरखास्त करुन नवीन विश्वस्तांची नेमणुक करण्याचा आदेश दिला...शिर्डीतील ग्रामस्तांनी न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. श्रीरामपूरचे माजी आमदार जयंत ससाणे हे साईबाबा संस्थानचे अध्यक्ष असून माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शंकरराव कोल्हे हे उपाध्यक्ष आहेत..या शिवाय विश्वस्त मंडळात 17 सदस्यांचा समावेश असून त्यामध्ये परराज्यातील काही व्यक्तींचा समावेश आहे..आता न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारला नवीन विश्वस्तांची नियुक्ती करावी लागणार आहे. साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळ बरखास्त करुन नवीन मंडळ नियुक्त करण्याचा निर्णय कोर्टाने दिला असला तरी या विश्वस्त मंडळाचा वेगळा इतिहास आहे.. माजी सनदी अधिकारी द.म. सुखथनकर य़ांनी या संस्थानचं अध्यक्ष पद दोन वेळा भोगलं आहे..पण ते वादात सापडल्यानंतर सरकराने विश्वस्त नियुक्तीसाठी वेगळा कायदाच तयार केला...हे सगळं का घडलं ते आता आपण पहणार आहोत. जगभरातील कोट्यवधी साई भक्तांच श्रद्धास्थान असलेलं शिर्डीतील हे साईबाबाचं मंदिर...साई बाबांच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो शिर्डीत येतात...साईबाबांवर त्यांच्या भक्तांची असलेल्या असीम श्रद्धेमुळेच साईबाबा संस्थान गेल्या काही वर्षात देशातील श्रीमंत देवस्थान म्हणून समोर आलंय...वर्षातील 365 दिवस बाबांच्या दर्शानासाठी मंदिरासमोर भक्तांची लांबच लांब रांग पहायला मिळते...कारण शिर्डीतील साई बाबांचा महिमाच काही वेगळा आहे....साईबाबा संस्थानचा पसारा गेल्या काही वर्षात वाढत गेला आणि श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणा-या फकीर बाबांच्या या देवस्थानाच्या उत्पन्नापुढे कुबेराचा खजिनाही फिका पडलाय. साईबाबा संस्थानची वाढती व्यप्ती लक्षात घेऊनच सरकारने संस्थानच्या विश्वस्त मंडळात लक्ष घालण्यास सुरुवात केली.. एकेकाळी या संस्थानच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी माजी सनदी अधिकारी द.म. सुखथनकर यांनी सांभाळली आहे... सगल दोन टर्म त्यांनी हे पद भोगलं आहे..पण एका उत्सवादरम्यान सुखथनकर यांनी एका विश्वस्ताच्या पत्नी बरोबर फुगडीचा फेर धरला आणि वादाची ठिणगी पडली.. त्यानंतर राज्य सरकारने सुखथनकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेलं विश्वस्त मंडळ बरखास्त करुन संस्थानचा कारभार अधिक पारदर्शी करण्यासाठी नवीन कायदाच तयार केला..काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने हे पाऊल उचललं होतं... साईबाबा संस्थानवर आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी राजकारण्यांनी कंबर कसली होती आणि त्यातूनच संस्थान विश्वस्त व्यवस्था कायदा करण्यात आला...विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील वजनदार नेते गोविंदरावर आदिक हे विधी आणि न्याय मंत्री असतांना हा कायदा करण्यात आला होता....संस्थानचे विद्यमान अध्यक्ष जयंत ससाणे हे त्याकाळी आदिकांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते....नवीन कायदा अस्तित्वात आल्यानंतर जयंतराव ससाणे यांची साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली..त्यावेळी काँग्रेसने अध्यक्षपद आपल्याकडं ठेवत उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं होतं..तसेच दोन्ही राजकीय पक्षाने आपआपल्या मर्जीतील व्यक्तींची विश्वस्त मंडळावर नेमणुक केली होती. जयंत ससाणेंची संस्थानच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे श्रीरामपूर विधानसभेसाठी आपला मार्ग मोकळा झाला असं गोविंदराव आदिकांना वाटलं होतं...कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही निय़ुक्ती करण्यात आली होती.पण जयंत ससाणे यांनी संस्थानच्या अध्यक्ष पदाबरोबरच विधानसभेची उमेदवारी मिळविण्यात यश मिळवलं...तसेच ते विधानसभेच्या निवडणुकीत विजय झाले... पुढच्या काळात ससाणे यांनी काँग्रेस पक्षात आपलं वजन वाढवून विश्वस्त मंडळाची मुदत वाढून घेण्यात यश मिळवलं...आणि संस्थानवर आपलं वर्चस्व राखलं.. शिर्डीच्या साईबाबा संस्थाननं गेल्य़ा पाच वर्षात घेतलेल्या निर्णयांपैकी काही निर्णय वादग्रस्त ठरले..आणि त्यामुळे विश्वस्त मंडळ आणि शिर्डीतील ग्रामस्थ यांच्यात चांगलाच संघर्ष पेटला होता..काही विश्वस्तांनी संस्थानचा पैसा आपल्या मतदार संघात वापरल्याचा आरोप त्यावेळी ग्रामस्थांनी केला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही राजकीय पक्ष राज्यात सत्तेत एकत्र असले तरी एकमेकांवर कुरघोडी करण्यात दोन्हीकडून एकही संधी सोडली जात नाही...सहकरी संस्था असो की एखादं देवस्थान प्रत्येक ठिकाणी आपलं वर्चस्व राखण्यासाठी राजकीय पक्षांकडून प्रयत्न केला जातो...तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून राजकीय लाभ घेण्य़ाचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून केला जातो...शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या बाबतीतही हेच घडलं आहे.. 2004मध्ये दोन्ही काँग्रेसच्या मर्जीतील व्यक्तींची विश्वस्त मंडळात वर्णी लावण्यात आली ...कारण हे संस्थान देशातील एक श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखल जातंय..त्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसन आपलं वर्चस्व स्थापण केलं होतं....पण त्यानंतर विश्वस्तांनी घेतलेले काही निर्णय वादग्रस्त ठरले..साईबाबा संस्थानच्या पैशातून कोपरगाव शहरातील मुख्य रस्ता बांधण्याचं निर्णय घेतला.. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शंकरराव कोल्हे यांनी या कामासाठी आग्रह धरला होता..संस्थानचे अध्यक्ष जयंत ससाणे यांनी शिर्डी- शनिशिंगणापूर हा रस्ता तयार करण्यासाठी संस्थानच्या खजिन्यातून निधी उपलब्ध करुन दिला..तो रस्ता ससाणे यांच्या श्रीरामपूर शहरातून जाणार होता...मात्र हा रस्ता केवळ श्रीरामपूर पर्यंतच बांधण्यात आला..या प्रकरणामुळे वाद निर्माण झाला होता.. जिल्हापरिषदेच्या शाळेतील मुलांना बसण्यासाठी दहा कोटी रुपयांची बाके देण्याचा निर्णय घेण्यात आला होता..मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या पत्नी जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष असतांना हा निर्णय घेण्यात आला होता..हा निर्णयही वादग्रस्त ठरला होता..साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांनी घेतलेले हेच निर्णय वादग्रस्त ठरले असं नाही तर गेल्या पाच वर्षात अनेक निर्णय़ांवरुन वादंग निर्माण झालं होतं.. साईबाबांच्या पादूका लंडनला नेण्याचा निर्णय तसेच शिर्डीतील विमानतळासाठी 50 कोटी रुपये देण्याच्या निर्णयावरुनही विश्वस्त आणि शिर्डी ग्रामस्त यांच्यात चांगलाच संघर्ष पेटला होता..संस्थानच्या या निर्णया विरोधात ग्रामस्तांनी बंदचं हत्यार उपसलं होतं..विमानतळाला 50 कोटी रुपये देण्याच्या निर्णयावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही एकमेकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला होता..विमानतळाला निधी देण्यास र राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला विरोध दर्शवला होता..मात्र पुढे तो विरोध मावळला..आणि त्यानंतर विमानतळासाठी निधी देण्यात आला.. साई संस्थानचं उत्पन्न वाढल्यामुळे संस्थानच्या विश्वस्त पदाला वलय प्राप्त झालं असून विश्वस्त मंडळावर आपली वर्णी लागावी म्हणून अनेकजण देव पाण्यात घालून बसले आहेत.. राधाकृष्ण विखे हे विधी आणि न्याय मंत्री असतांना विश्वस्त मंडळात बदल होईल असं शिर्डीकरांन वाटलं होतं..पण दोन्ही काँग्रेसमध्ये विश्वस्तांच्या नावावर एकमत होत नसल्यामुळं नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात आलंच नाही... आणि जुन्याच विश्वस्त मंडळाला मुदतवाढ मिळत गेली.. 2014मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे तर 2018मध्ये साईबाबांच्या समाधीला शंभरवर्षपूर्ण होणार आहे..या दोन्ही मोठ्या सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत भक्तींची गर्दी पूर्वीपेक्षा वाढणार आहेत ...त्यामुळे संस्थानचं उत्पन्नही वाढणार या कुणालाच शंका नाही...आगामी काळात होवू घातलेल्या या कार्यक्रमामुळं संस्थानच्या विश्वस्त मंडळावर आपली वर्णी लागावी यासाठी अनेकांनी कंबर कसली आहे. साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं एक गाव...आज याच शिर्डीनं देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे...साईबाबामुळेच शिर्डीला ही महती प्राप्त झाली आहे...आज जगभर कोट्यवधी साईभक्त पसरले आहेत ...आज शिर्डीत दिवस-रात्र साईभक्तांचा राबता असतो.....रोज 50 हजार साई भक्त बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल होत असतात..आणि त्यामुळचं साईबाबा संस्थानचं उत्पन्न वाढलं आहे... रोज जवळपास एक कोटी रुपयांचं उत्पन्न संस्थानच्या तिजोरीत जमा होतंय. भविष्यात या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे...कारण 2014मध्ये नाशिक मध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जाणार असून त्याकालावधीत शिर्डीला दर्शनासाठी येणा-या भाविकांची गर्दी वाढणार आहे...यापार्श्वभूमिवर साईबाबा संस्थानलाही केंद्रसरकारकडून निधी उपलब्ध केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे..कुंभमेळ्यानंतर 2018मध्ये साईबाबांच्या समाधीला वर्ष पूर्ण होणार आहेत..त्यानिमित्ताने शिर्डीत वर्षभर विविध कार्यक्रमांच आयोजन केलं जाणार आहे...आगामी वर्षात होणा-या या कार्यक्रमांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून शिर्डी संस्थानला
मोठी आर्थिक मदत मिळविण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.. या पर्श्वभूमिवर संस्थानच्या विश्वस्त मंडळावर आपली नियुक्त व्हावी म्हणून अनेकांनी आतापासूनच अनेक इच्छुकांनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडं फिल्डींग लावण्यास सुरुवात केलीय..नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडललेल्या आहेत...तर 2014मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत..या निवडणुकांमध्ये नाराज कार्यकर्त्यांचं संस्थानच्या विश्वस्त मंडळावर पुनर्वसन केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण या नियुक्त्या करतांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तारेवरची कसरत करावी लागणार आहे..कारण विश्वस्तांची नावं निश्चित करतांना दोन्ही काँग्रेसमध्ये मतभेद होण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केलीय. सहा महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी साईसंस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावे अशी मागणी केली होती..त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबड उडाली होती..या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमिवर साईबाबा संस्थानच्या अध्यक्ष पदापासून ते विश्वस्त निवडीत पर्यंत राजकीय चढाओढ लागणार यात शंका नाही. साईबाबा संस्थानवर लवकरच नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती केली जाणार आहे...पण त्यासाठी इच्छुकांनी आतापासून आपल्या राजकीय गॉडफादरकडं वशिला लावण्यास सुरुवात केलीय...पण ही निवड करतांना दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना चांगलीच कसरत करावी लगाणार आहे.. शिर्डीच्या साईबाबा संस्थानचं अध्यक्ष पद आमदारकीच्या तोलामोलाचं बनलंय. तर विश्वस्तपदालाही मोठं महत्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे आपली वर्णी विश्वस्त मंडळावर लागावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत..कारण कोर्टाच्या निर्णयामुळं नवीन विश्वस्त नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे..उच्च न्यायालयाने विश्वस्त मंडळ बरखास्त करुन नवीन मंडळ नियुक्त करण्याचा आदेश दिला आहे..कोर्टाच्या या निर्णयावर विद्यमान अध्यक्षांनी ही प्रतिक्रीया दिलीय.. नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त करण्याच्या कोर्टाच्या आदेशामुळं इच्छुक कामाला लागले असून त्यांनी आपल्या राजकीय गॉडफादरकडं लॉबिंग सुरु केल्याची चर्चा सुरु झाली आहे..साईबाबा संस्थानवर विश्वस्तांची निवड करतांना शिर्डीतील स्थानिकांना प्राध्यन्य देण्यात यावं यासाठी एक गट सक्रीय झाला आहे.. अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे, थोरात,कोल्हे, आदिक या नेत्यांचा दबदबा असून विश्वस्तांची निवड करतांना या नेत्यांचं कसब पणाला लागणार आहे. साई संस्थानच्या विश्वस्तपदी आपली निवड व्हावी म्हणुन देशाच्या विविध भागातील लोकही इच्छुक आहेत..खरंतर विश्वस्त हा महाराष्ट्रातील रहिवासी असावी अशी अट आहे..पण त्याची अंमल बजावणी होणार या प्रश्नाचं उत्तर नवीन विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीनंतरच स्पष्ट होईल.
First Published: Tuesday, March 13, 2012, 23:40