Last Updated: Monday, January 27, 2014, 14:43
अंदमान निकोबारजवळ अॅक्वा मरिना बोट अपघातात ठाण्याच्या रोटरी क्लबचे चंद्रशेखर भोसेकर आणि त्यांच्या पत्नी अलका यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या दोन मुलांना वाचवण्यात यश आलंय.
Last Updated: Sunday, January 26, 2014, 22:37
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा टोलविरोधी आक्रमक भूमिका घेतलीय. टोल नाक्यावर टोल भरू नका, कोणी आडवे आले तर फोडून काढा असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. त्यानंतर लगेच याची अंमलबजावणी केली आणि ऐरोलीतील टोल नाक्याची तोडफोड केली गेली.
Last Updated: Monday, January 27, 2014, 14:44
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नवी मुंबईत गरजलेत. त्यांनी राज्य सरकारला टार्गेट केलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हल्लाबोल करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ठाकरी भाषेत समाचार घेतला. अजित पवार आम्ही गांडू नाहीत. तुमची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा राज यांनी दिला.
Last Updated: Sunday, January 26, 2014, 20:32
`लेझीम` हा महाराष्ट्राचा मर्दानी खेळ, आणि याच क्रीडा प्रकारात सांगली शिक्षण संस्थेच्या मुलांनी आज ऐतिहासीक कामगिरी केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ७ हजार ३३८ विध्यार्थिनीनी महालेझीम सादर करून नवा विश्वविक्रम केला आहे. या विश्वविक्रमाची नोंद `गिनीज बुक ऑफ वल्ड रेकोर्ड` मध्ये करण्यात आली आहे.
Last Updated: Sunday, January 26, 2014, 17:18
नाशिक महानगर पालिकेच्या कारभाराबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर मनसेचे पदाधिकारी कामाला लागलेत. रोजच्या बैठका आणि पाहाणी दौरे करून नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यायला सुरूवात केलीय.
Last Updated: Sunday, January 26, 2014, 11:54
बोर्डी रोड स्टेशनजवळील रेल्वे रुळावर बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास स्थानिकांना मृत अर्भक आढळले. मात्र या अर्भकाचे उंदीर घुशींनी लचके तोडले होते. या घटनेचा नागरिकांमधून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतोय.
Last Updated: Saturday, January 25, 2014, 23:04
नुकत्याच जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांत पुण्यानं बाजी मारल्याचं दिसून येतंय. कारण, पद्म पुरस्कारांमध्ये सर्वोच्च समजला जाणारा `पद्मविभूषण` हा पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर आणि योगागुरू बी. के. एस. अय्यंगार या दोघांना जाहीर झालाय आणि उल्लेखनीय म्हणजे हे दोघेही पुण्याचेच सुपूत्र आहेत
Last Updated: Saturday, January 25, 2014, 20:10
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रीकर परदेशींच्या समर्थनासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. श्रीकर परदेशींची बदली होणार अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे.
Last Updated: Saturday, January 25, 2014, 08:13
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं मनमाडमध्ये मंदिर उभारण्यात येणार आहे. यानिमित्त आज विशेष भंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या चांदीच्या मूर्तीची या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येईल.
Last Updated: Friday, January 24, 2014, 21:36
इंदापूर तालुक्यातील मारकड बापूंचा `राजा` मल्ल दरोरोज दोन किलो गहू, मका, कणकेचे गोळे, म्हशीचे दूध आणि सहा अंडी असा खुराक घेतो. चार पायांवर ११० किलोचे वजन तोलणाऱ्या `राजा`चं पंचक्रोशीत काय ते कौतुक...
आणखी >>