बिग बीच्या हाती ऑलिम्पिकची मशाल

Last Updated: Thursday, July 26, 2012, 17:42

बॉलिवूडचा महानायक बिग बी अमिताभ बच्चन लंडनमधील ऑलिम्पिक स्पर्धेत ज्योत घेऊन धावणार आहे. लंडनमध्ये लिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ज्योत रिले स्पर्धेचे उद्या आयोजन करण्यात आले आहे. या रिलेत भाग घेण्याचा मान बिग बीला देण्यात आला आहे.

कलमाडींना ऑलिंपिक उद्घाटनास जाण्यास मज्जाव

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 22:38

कलमाडींच्या लंडनवारीला दिल्ली हायकोर्टानं मनाई केली आहे. कलमाडींची ऑलिम्पिकच्या उदघाटन सोहळ्याला हजेरी म्हणजे देशासाठी शरमेची बाब होईल, असं कोर्टानं म्हंटलंय. देशाचं हित लक्षात घेत हा निर्णय दिल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय.

मायकल फेल्प्स : ऑल टाईम ग्रेट

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 13:12

ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचा स्टार स्विमर मायकल फेल्प्स क्रीडाप्रेमींसाठी सेन्टर ऑफ अॅट्रॅक्शन ठरणार आहे. २००८ बिजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यानं स्विमिंगच्या आठ इव्हेंट्समध्ये गोल्ड मेडल पटकावत नवा इतिहास रचला होता. आता २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याच्यासमोर बीजिंग ऑलिम्पिकची पुनरावृत्ती करण्याचं आव्हान असणार आहे.

सुशीलकुमार भारताचा फ्लॅग बेअरर

Last Updated: Tuesday, July 17, 2012, 13:10

लंडन ऑलिम्पिकमध्ये अव्वल कुस्तीपटू सुशील कुमारला भारताचा फ्लॅग बेअरर बनण्याचा मान मिळाला आहे. सुशीलनं २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी ब्राँझ मेडलची कमाई केली होती. आणि त्यामुळेच त्याला भारतीय टीमचा फ्लॅग बेअरर होण्याचा मान मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक नावांची चर्चा झाली होती. आणि अखेर सुशील कुमारच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

सानिया मिर्झा डबल्स मेडलची दावेदार

Last Updated: Sunday, July 15, 2012, 12:45

सानिया मिर्झाकडूनही भारताला मेडल्सच्या अपेक्षा आहे. लंडनमध्ये ती वुमेन्स डबल्स आणि मिक्स डबल्समध्ये मेडलची दावेदार आहे.सानियाचा जलवा लंडनमध्ये चालला तर भारताला अजून ऑलिम्पिक मेडलही पक्क होईल.

मी ऑलिम्पिकला जाणार म्हणजे जाणार- कलमाडी

Last Updated: Saturday, July 14, 2012, 22:16

पंतप्रधानांनी केंद्रीय क्रीडा मंत्री अजय माकन यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सुरेश कलमाडींनी केली आहे. माकन यांच्या वक्तव्यानं धक्का बसल्याचंही कलमा़डींनी म्हटलं आहे.

मी अ'प्रामाणिक' नाही - पिंकी

Last Updated: Thursday, July 12, 2012, 12:18

स्त्री नसून पुरुष असल्याचा आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या पिंकी पुराणिकला जामीन मिळालाय. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पिंकीनं तुरुंगात असताना आपल्याशी गैरवर्तवणूक करण्यात आल्याचा आरोप केलाय. तसंच आपल्यावर खोटे आरोप करण्यात आल्याचंही तिनं म्हटलंय.

ऑलिम्पिक 'गाव'... रासलीला चाललीये 'राव'

Last Updated: Thursday, July 12, 2012, 11:17

ऑलिम्पिक म्हणजे खेळांचा कुंभमेळाच... आणि याच कुंभमेळात अनेकजण हरवूनही जातात... अहो इतर कुठे दुसरीकडे नाही तर एका वेगळ्याच खेळामध्ये...एकीकडे ऑलिम्पिकमध्ये महत्त्वाचे खेळ सुरू असताना खेळाडू त्यांचे वेगळेच खेळ खेळत असतात.

सानिया मिर्झाच्या आईला ऑलिम्पिकचं तिकीट!

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 22:00

ऑल इंडिया टेनिस असोसिएशननं अजून एक नवा वाद निर्माण केला आहे. सानिया मिर्झाच्या आईला टेनिस फेडेरेशननं ऑलिम्पिक टेनिस टीमच्या सपोर्ट स्टाफमध्ये सहभागी केल्यामुळेच एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

ऑलिम्पिकमध्ये ११ शूटर्स घेणार सुवर्णवेध

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 20:59

लंडनमध्ये भारताला सर्वाधिक अपेक्षा असणार ते शुटिंगमध्ये... अथेन्समध्ये राज्यवर्धन सिंग राठोड आणि बीजिंगमध्ये अभिनव बिद्रानं मेडल पटकावलेय. आता लंडनमध्ये तब्बल ११ शूटर्स सुवर्णवेध घेण्यासाठी सज्ज आहेत.