अबब.... एवढा मोठा पेन, आजवर नाही पाहिला

Last Updated: Saturday, February 25, 2012, 22:43

फार पूर्वीपासून लेखणीचं महत्व राहिलं आहे. पूर्वीच्या काळी लिखाणसाठी दौत किंवा टाक वापरत असत. हळूहळू त्याची जागा पेनानं घेतली. आपण बाजारात विविध प्रकारचे पेन नेहमीच पाहिले असतील पण एक असं ही विक्रमी पेन आहे ज्याची लांबी आहे तब्बल १८ फूट आहे.

चित्रा पाटील यांची गरूडझेप

Last Updated: Friday, February 24, 2012, 13:46

एमबीए झालेल्या शेकापच्या चित्रा पाटील यांनी विक्रमी ८ हजारांचे मताधिक्य घेत जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला असला तरी त्यांचा ओढा हा राजकारणात नसून समाजकारणात आहे. समाजकारण करण्यासाठी त्यांनी राजकारणाचा हाताशी पकडले आहे. त्यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा ध्यास घेतला आहे.

नाशिकचे करोडपती नगरसेवक

Last Updated: Friday, February 24, 2012, 17:15

नाशिक महापालिकेत नव्यानं निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये २० पेक्षा जास्त जण बांधकाम व्यावसायिक आहेत. तर काही नगरसेविकांचे पती ठेकेदार आहेत. पन्नासहून अधिक नगरसेवक करोडपती आहेत. आता त्यांच्या हातात शहराचे भवितव्य आहे.

तुझं माझं जमेना...

Last Updated: Thursday, February 23, 2012, 23:40

शिवसेनाप्रमुखांच्या बोलण्यातला बदललेला नूर यावेळी भाजपला चांगलाच झोंबलाय. आणि म्हणूनच भाजप अध्यक्षानी राऊताना केंद्रस्थानी ठेवत मातोश्रीवर तोफ डागली. गेल्या काही दिवसातला भाजपच्या नव्या नेत्यानी जागावाटपासाठी आग्रह बाळासाहेबाच्या टिकेच्या टप्य़ात आलाय.

गौरवला मिळाली ११ हजारांची मदत

Last Updated: Thursday, February 23, 2012, 13:27

ल्गेरियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऍरोबिक जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या औरंगाबादमधील गौरव जोगदंड याला शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी अकरा हजार रूपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

फक्त एकच 'साहेब' बाळासाहेब...

Last Updated: Thursday, February 23, 2012, 11:30

शिवसेनेला स्थापनेपासून संघर्ष करावा लागतोय. प्रत्येक राजकीय वादळात शिवसेना संपेल अशा वावड्या नेहमीच विरोधकांकडून उठवण्यात आल्या. पण दरवेळी सर्व प्रश्नांना एकच उत्तर पुरेसं ठरतं- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे....

'मनसे'चा झंझावात

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 21:47

यावेळेला ना कुठला प्रखर मुद्दा होता ना कुठलं खळ्ळ फटॅक! तरी पण प्रत्येक शहरात केवळ एकच सभा घेऊनही केवळ राज ठाकरे या नावावर मनसेला दिमाखदार असं यश लाभलं. मत विभाजन करणारा पक्ष अशी टीका करणाऱ्यांनाच आता मत खेचणारा पक्ष अस म्हणावं लागत आहे.

काय आहे राज ठाकरेंच्या सत्तेचा 'राज'मार्ग?

Last Updated: Thursday, February 23, 2012, 11:30

किंगमेकरालाही करावी लागणार का सत्तेसाठी तडजोड ? महापालिका निकालानंतर कसा असेल पुढचा प्रवास ? इंजिन धावेल सुसाट की निघेल नुसताच धूर ? सत्तेचा 'राज'मार्ग !

ठाण्यात सत्तेसाठी शिवसेनेचा जादुई आकडा

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 09:57

ठाण्यात महायुती सत्तेच्या जवळ गेलीय. अपक्ष आणि बसपाच्या पाठिंब्यानं बहुमताच्या जादुई आकडा गाठण्यात यश आल्याचा दावा शिवसेनेनं केलाय. अर्थात काँग्रेस आघाडीनंही सत्तेत येण्याचे प्रयत्न सोडलेले नाहीत.

कोण आहे तुमचा नगरसेवक (अमरावती)

Last Updated: Monday, February 20, 2012, 17:13

गुरूवारी मतदार राजाने मतदान केले आणि अमरावती ८७ जागांसाठी आपला उमेदवार निवडला आहे. हा विजयी उमेदवार आता पुढच्या पाच वर्षासाठी महापालिकेत तुमचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तर कोण आहे तुमचा नगरसेवक जाणून घ्या......